अाशियाई स्पर्धा : सुवर्णपदकाची दावेदार मीराबाई चानूने घेतली माघार

अाशियाई स्पर्धा : सुवर्णपदकाची दावेदार मीराबाई चानूने घेतली माघार

नवी दिल्ली – इंडोनिशाया मध्ये या महिन्यात होणाऱ्या आशियाई खेळापूर्वी भारताला झटका बसला आहे. भारतासाठी सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार असणारी चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने पाठ दुखीच्या कारणामुळे आशियाई खेळातून आपले नाव मागे घेतले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आशियाई खेळ 18 आॅगस्टपासून सुरू होणार आहेत. मीराबाईने भारतीय वेटलिफ्टिंग महासंघास ई-मेल करून खेळातून बाहेर ठेवण्यासाठी विनंती केली आहे.

नोव्हेंबर मध्ये मीराबाईने 22 वर्षानंतर जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकाविले होते. तसेच अमेरिकेच्या अनाहेममध्ये झालेल्या चॅम्पियनशीपमध्येही 48 किलो वजनीगटात 194 किलो (85 किलो आणि 109 किलो) वजन उचलून विक्रम केला होता. एप्रिल महिन्यांत कोस्ट राष्ट्रमंडल खेळात तिने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत 196 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळविले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)