जागतिक बॅंकेच्या अध्यक्षांचा राजीनामा

वॉशिंग्टन: जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला आहे. पदाचा कार्यकाळ संपण्याच्या सुमारे तीन वर्षे आगोदरच किम यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षांच्या निवडीच्या मुद्दयावरून अमेरिका आणि अन्य सदस्य देशांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. किम 1 फेब्रुवारीपासून अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्‍त होणार आहेत.

किम हे 6 वर्षांपासून जागतिक बॅंकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांना 2017 मध्ये मुदतवाढ मिळाल्याने त्यांचा कार्यकाळ 2022 पर्यंत होता. अध्यक्षपद सोडल्यानंतर किम यांनी खासगी गुंतवणूक संस्थेमध्ये काम करण्याचे ठरवले आहे. जागतिक बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्तियाना जोर्जिएवा हे हंगामी अध्यक्ष म्हणून 1 फेब्रुवारीपासून काम बघणार आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)