जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

सिंधू, सायना, साई प्रणीथ उपान्त्यपूर्व फेरीत
नानजिंग; लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने माजी विजेत्या रत्चानोक इन्तेनॉनवर सनसनाटी विजयाची नोंद करताना विजयाची नोंद करताना येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. भारताची जागतिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू आणि बी. साई प्रणीथनेही उपान्त्यपूर्व फेरी गाठली. मात्र अव्वल पुरुष खेळाडू किदंबी श्रीकांतचे आव्हान उपउपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.
सायनाने थायलंडच्या चतुर्थ मानांकित रत्चानोक इन्तेनॉनचे आव्हान 21-16, 21-19 असे 47 मिनिटांच्या झुंजीनंतर संपुष्टात आणले. याआधी 2015 च्या जागतिक स्पर्धेक रौप्यपदक, आणि गेल्या वर्षी कांस्यपदक जिंकणाऱ्या सायनासमोर आता मात्र ऑलिम्पिक विजेती आणि दोन वेळची माजी जगज्जेती स्पेनची कॅरोलिना मेरिनचे जबरदस्त आव्हान आहे. मेरिनने जपानच्या 15व्या मानांकित सायाका सातोचा 21-7, 21-13 असा केवळ 32 मिनिटांत फडशा पाडला.
तृतीय मानांकित सिंधूने कोरियाच्या नवव्या मानांकित संग जि हयुनची झुंज साई प्रणीथने डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्टियन सोलबर्गचे आव्हान 21-13, 21-11 असे 39 मिनिटांत मोडून काढले. त्याच्यासमोर आता जपानच्या सहाव्या मानांकित केन्टो मोमोटाचे आव्हान आहे. पाचव्या मानांकित श्रीकांतला मात्र मलेशियाच्या माजी फ्रेंच सुपर सेरीज विजेत्या डॅरेन लियूविरुद्ध 18-21, 18-21 असा 47 मिनिटांत पराभव पत्करावा लागला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)