जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : साई प्रणीथचीही आगेकूच

सिंधू, श्रीकांत उपउपान्त्यपूर्व फेरीत
नानजिंग: भारताची जागतिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू आणि स्टार खेळाडू किदंबी श्रीकांत यांच्यासह बी. साई प्रणीथनेही परस्परविरुद्ध शैलीत विजयाची नोंद करताना येथे सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला व पुरुष एकेरीच्या उपउपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र पुरुष एकेरीत एच. एस. प्रणयचे, तसेच पुरुष दुहेरी आणि महिला दुहेरीत भारतीय जोड्यांचे आव्हान उपउपान्त्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

रिओ ऑलिम्पिक रौप्यविजेत्या सिंधूला पहिल्या फेरीत बाय मिलाला होता. आज दुसऱ्या फेरीच्या लढतीत सिंधूने इंडोनेशियाच्या फित्रियानी फित्रियानी हिच्यावर 21-14, 21-9 अशी 35 मिनिटांत मात केली. तृतीय मानांकित सिंधूसमोर उपउपान्त्यपूर्व फेरीत कोरियाच्या नवव्या मानांकित संग जि हयुनचे आव्हान आहे. भारताची अनुभवी खेळाडू सायना नेहवालसमोर पुढच्या फेरीत थायलंडच्या चतुर्थ मानांकित रत्चेनोक इन्तेनॉनचे आव्हान आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या मोसमात चार सुपर सेरीज स्पर्धा जिंकून खळबळ उडविणाऱ्या भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरीतील दुसऱ्या फेरीच्या लढतीत स्पेनच्या माजी अग्रमानांकित पाब्लो ऍबियनची कडवी झुंज 21-15, 12-21, 21-14 अशी एक तासाहून अधिक काळ रंगलेल्या लढतीत संपुष्टात आणताना आपली आगेकूच कायम राखली. पाचव्या मानांकित श्रीकांतसमोर आता मलेशियाच्या डॅरेन लियूचे आव्हान आहे. विश्‍वक्रमवारीतील माजी टॉप-10 खेळाडू असलेल्या लियूने याआधी फ्रेंच ओपन सुपर सेरीज स्पर्धा जिंकली होती.

पहिल्या फेरीत पुढे चाल मिळालेल्या साई प्रणीथने दुसऱ्या फेरीत स्पेनच्याच लुईस एन्‍रिक पेनाल्व्हेरचा 21-18, 21-11 असा पराभ” केला. उपउपान्त्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्टियन सोलबर्गचे आव्हान आहे. मात्र अकराव्या मानांकित प्रणयला दुसऱ्या फेरीच्या लढतीत ब्राझिलच्या वायगोर कोएल्होविरुद्ध 21-8, 16-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)