जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सायनाचे आव्हान संपुष्टात 

सिंधू, साई प्रणीथ उपान्त्य फेरीत

नानजिंग: भारताची ऑलिम्पिक रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू आणि बी. साई प्रणीथ यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. मात्र अनुभवी खेळाडू सायना नेहवालचे महिला एकेरीतील आव्हान उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले.
तृतीय मानांकित सिंधूने जपानच्या आठव्या मानांकित नोझोमी ओकुहाराची झुंज मोडून काढली. तर साई प्रणीथने जपानच्या सहाव्या मानांकित केन्टो मोमोटाचे आव्हान संपु÷टात आणताना आगेकूच केली. मात्र सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा या जोडीलाही मिश्र दुहेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. त्याआधी पाचव्या मानांकित श्रीकांतला मलेशियाच्या माजी फ्रेंच सुपर सेरीज विजेत्या डॅरेन लियूविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे.
याआधी 2015 च्या जागतिक स्पर्धेक रौप्यपदक, आणि गेल्या वर्षी कांस्यपदक जिंकणाऱ्या सायना नेहवालने आधीच्या फेरीत माजी विजेत्या रत्चानोक इन्तेनॉनवर सनसनाटी विजय मिळविला होता. परंतु ऑलिम्पिक विजेती आणि दोन वेळची माजी जगज्जेती स्पेनच्या कॅरोलिना मेरिनसमोर सायनाची मात्रा चालली नाही. आधीच्या फेरीत जपानच्या 15व्या मानांकित सायाका सातोचा फडशा पाडणाऱ्या कॅरोलिना मेरिनने सायनाचे आव्हान 21-6, 21-11 असे केवळ 31 मिनिटांत संपुष्टात आणताना महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली.
महत्त्वाच्या सामन्यात आपला खेळ कमालीचा उंचावण्याचा लौकिक कायम राखताना कॅरोलिना मेरिनने सायनाविरुद्ध चौफेर खेळ केला. सायना नेहवालचा कच्चा दुवा असल्याचे हेरून मेरिनने तिला पेचात पकडले. तसेच सायनाचे पदलालित्य अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे हेरून मेरिनने तिला अनेकदा नेट आणि बेसलाईन या दोन टोकांवर खेळवीत निष्प्रभ केले. वास्तविक पाहता या दोघींमधील लढतींची आकडेवारी मेरिन पाच वेळा विजयी व सायना चार वेळा विजयी अशी चुरशीची आहे. परंतु आजच्या लढतीत मेरिनने सायनावर संपूर्ण वर्चस्व गाजविले.
सायनानेही मेरिनची प्रशंसा करताना सांगितले की, मेरिन इतक्‍या वेगाने हालचाल करीत होती, तिचे पदलालित्य इतके वेगवान होते की मला संधीच मिळाली नाही. तसेच संथ लयीत खेळत असताना अचानक वेगात बदल करून झंझावाती आक्रमक फटके लगावण्याचे मेरिनचे कौशल्य वादातीत आहे. तसेच माझी याआधीची लढत काल रात्री उशिराने झाली होती. त्यामुळे मला पुरेशी विश्रांतीही मिळाली नव्हती. परिणामी माझ्या हालचाली किंचित संथ होत होत्या आणि मेरिनसाठी तेवढे पुरेसे असते. मेरिनने मला माझा खेळ करण्याची संधीच दिली नाही.
मेरिनसमोर उपान्त्य फेरीच्या लढतीत चीनच्या सहाव्या मानांकित हे बिंगजियावचे आव्हान आहे. हे बिंगजियावने महिला एकेरीतील सर्वाधिक सनसनाटी निकालाची नोंद करताना तैपेई चीनच्या अग्रमानांकित व विजेतेपदासाठी सर्वाधिक पसंती देण्यात आलेल्या तेई त्झु यिंग हिच्यावर 21-18, 7-21, 21-13 अशी मात करीत उपान्त्य फेरीत धडक मारली. बिंगजियावविरुद्ध मला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, असे मेरिनने म्हटले आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)