जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : किदाम्बी श्रीकांतची तिसऱ्या फेरीत धडक

नानजिंग – जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत भारतीय बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने आज स्पेनच्या पाब्लो अबियायनचा धुव्वा उडवत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. किदाम्बी श्रीकांतने पाब्लो अबियायनचा २१-१५, १२-२१, २१-१४ असा तीन सेटमध्ये पराभव केला.

पहिला सेट श्रीकांतने २१-१५ जिंकला होता. परंतु दुसऱ्या सेटमध्ये पाब्लो अबियायनने आक्रमक खेळी करून १२-२१ अशी बाजी मारली. दोघांमध्ये बरोबरी झाल्याने पुढील फेरी कोण गाठणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. मात्र तिसऱ्या सेटमध्ये किदाम्बी श्रीकांतने संयमी खेळी करत पाब्लो अबियायनने २१-१४ असा धुव्वा उडविला. व तिसरी फेरी गाठली.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)