जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : सायना नेहवाल उपांत्यपूर्व फेरीत

नानजिंग- भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने गुरूवारी झालेल्या सामन्यात प्रतिस्पर्धी थायलंडची रतचानोक इंतानोन हिचा पराभव करत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत तिच्यासमोर स्पेनच्या कैरोलीना मारिन हिचे आव्हान असणार आहे. मागील वर्षी याच स्पर्धेत कांस्यपदक जिकंणाऱ्या सायनाने आठव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

सायनाने 47 मिनीटापर्यत चाललेल्या या सामन्यामध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या रतचानोक हिचा 21-16, 21-19 अशा सेटने पराभव केला. या विजयामुळे सायनाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिला उपांत्यपूर्व फेरित स्पेनच्या कैरोलीना हिला सामोरे जावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)