नवाजुद्दीनसोबत काम करणे अभिमानास्पद : सान्या मल्होत्रा 

दंगल गर्ल सान्या मल्होत्रा “फोटोग्राफ’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात ती नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत काम करत आहे. याबाबत सान्या म्हणाली, “फोटोग्राफ’मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कारण नवाजुद्‌दीन हा माझा आवडता अभिनेता असल्याने त्याच्यासोबत काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे.

सान्याने फॅशन डिझायनर रितु कुमार याच्या स्टोर लॉन्चवेळी मीडियाशी बोलताना म्हणाली, मी “दंगल’नंतर आता “फोटोग्राफ’चे शूटिंग सुरू केले आहे. ही बाब माझ्यासाठी खूपच खास आहे. हा माझा दुसरा चित्रपट होता. पण “दंगल’नंतर “पटाखा’ प्रदर्शित झाला. रितेश बत्रा आणि नवाज सर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खुपच रोमांचकारी ठरला आहे.

-Ads-

सान्या म्हणाली, चित्रपटाची शुटिंग सुरू झाल्यानंतर सुरूवातीला मी थोडी नर्व्हस होते. पण, त्यानंतर मी त्यांचे सर्व इंटव्यू पाहिले. त्यात ते कशा प्रकारे आपली भूमिका साकारतात, याचे निरिक्षण केले. त्यामुळे मला त्यांच्यासोबत काम करताना थोडा आत्मविश्‍वास मिळाला, असे तिने सांगितले. “फोटोग्राफ’चे काम पूर्ण होत आले असून तो लवकरच प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)