कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही

दादासाहेब ओव्हाळ : समाजघटकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील

सातारा – कार्यकर्ते हा रिपब्लिकन चळवळीचा आत्मा असून कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्याची कदापि गय केली जाणार नाही, असा इशारा रिपब्लिकन ब्ल्यू फोर्सचे प्रदेशाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांनी दिला.कोरेगाव येथे आयोजित तालुकास्तरिय पदाधिकारी मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, कार्याध्यक्ष अजित नलवडे गणेश भोसले, विनोद बोतालजी, अमित मोरे, नगरसेवक शोभाताई येवले, अभिजीत येवले, नितीन बोतालजी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुढे बोलताना ओव्हाळ म्हणाले, सर्वसामान्य, शोषित व वंचीत घटकांचा आवाज आणि त्यांच्या न्याय हक्क प्राप्त करण्यासाठी उभारण्यात आलेल्या रिपब्लिकन चळवळीत कार्यकर्ता हा आत्मा असतो. आज या कार्यकर्त्याला त्रास देणारे परकीय कमी व स्वकीय अधिक झाले आहेत. अशांची कदपि गय केली जाणार नाही.

कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी तसेच भविष्यात कार्यकर्ता कर्तृत्वाने मोठा झाला पाहिजे, यासाठी सर्वप्रकारे मदत केली जाईल. कातकरी समाजाला साठ वर्षे उलटून ही वीज ,पाणी, निवारा उपलब्ध होवू शकला नाही. त्यासाठी कातकरी समाज शासकीय कार्यालर्यांचे ऊंबरे झिजवतोय. मात्र, त्यांची कुणालाच कीव येत नाही. तसेच मातंग व बौध्द समाज घटकांना घरकुलापासून वंचित ठेवले आहे. निराधार, वृध्द, विधवा, कलाकार यांना पेंशन नाही. मात्र, ब्ल्यू फोर्सच्यावतीने येत्या काळात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्वांचे प्रश्‍न सुटले पाहिजेत. यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जातील, असे ओव्हाळ यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)