प्रशिक्षकांवरून भारतीय महिला संघात पडले दोन गट

नवी दिल्ली – भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार याचां संघासोबतचा करार 30 नोव्हेंबरलाच संपुष्टातआला आहे. मात्र तरीही प्रशिक्षक रमेस पोवार आणि भारतीय महिला क्रिकेट संघांतील अनुभवी खेळाडू मिताली राज यांच्या वादावर अद्यापही पडदा पडलेला नाही.

आता प्रशिक्षकांवरून भारतीय महिला संघातच दोन गट झाल्याने दिसून येत आहे. टी20 महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत आणि उपकर्णधार स्मृति मानधना यांनी प्रशिक्षक म्हणून रमेश पोवारांना पाठिबां दर्शविला आहे. तर मिताली राज हिच्यासह इतर एकता बिश्त आणि मानसी जोशी यांनी पोवार यांना विरोध दर्शविला आहे.

-Ads-

प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी हरमनप्रीत आणि स्मृतीला 2021 पर्यंत पोवार हेच प्रशिक्षक म्हणून हवे असल्याचे पत्राव्दारे कळविले आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. रमेश पोवार याचां संघासोबतचा करार 30 नोव्हेंबरलाच संपुष्टातआला आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदासाठी पोवार हे नव्याने अर्ज करू शकतात.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)