महिलांच्या टी20 क्रिकेटमध्ये भारताचे विजयाचे अर्धशतक

File photo

हरमनप्रीत कौरची शतकी खेळी आणि तिला जेमीमा रॉड्रीक्‍झने दिलेल्या साथीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या किफायतशीर गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिलासंघाने न्युझीलंडच्या संघाचा 34 धावांनी पराभव करत स्पर्धेत विश्‍वचषक टी-20 स्पर्धेची धडाक्‍यात सुरुवात केली आहे.

या विजयाबरोबरच महिलांच्या टी20 क्रिकेटमध्ये भारताने विजयाचे अर्धशतक साजरे केले आहे. भारताने एकूण 94 टी20 सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताने 50 टी20 सामन्यात विजय संपादन केला आहे, तर 42 सामने गमावले आहेत. दोन लढती अनिर्णयीत राहिल्या आहेत.

महिला टी20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाने 20 षटकांत 5 बाद 194 धावां केल्या. ही विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

तसेच महिलांच्या टी20 क्रिकेटमध्ये भारताने दुसऱ्यांदा 190 हून अधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी मुंबईत झालेल्या सामन्यात इंग्लंडविरूध्द भारताने 4 बाद 198 धावा केल्या होत्या.

दरम्यान ,कालच्या विजयात भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा मोलाचा वाटा उचलला. हरमप्रीतने न्यूझीलंडविरूध्द आपला पहिला सामना खेळत असताना शतक झळकावलं. या शतकाबरोबरच हरमनप्रीत कौर ही टी20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तर महिलांच्या टी20 विश्वचषकामध्ये शतक झळकाविणारी तिसरी महिला खेळाडू ठरली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)