पुलवामा हल्ल्याचा महिला पक्षाकडून निषेध

नवी दिल्ली – पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याने देशभर संतापाची लाट आहे. जवानांच्या कुटुंबीयाच्या दुःखात सहभागी असल्याचे नॅशनल वुमेन्स पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. श्‍वेता शेट्टी यानी म्हटले आहे.

दहशतवाद्यानी केलेला हा हल्ला भ्याड स्वरूपाचा होता. कामी आलेल्या जवानाना आम्ही सलाम करतो. यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांचे डोळे पाणावले आहेत. आम्हीही या जवानांच्या कुटुंबीयाच्या दुःखात सहभागी आहोत, असे डॉ. शेट्टी म्हणाल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या कारवायामध्ये मनुष्य आणि वित्तहानी होत आहे. याचा महिलावर्गावर जास्त परिणाम होत असल्याचे त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)