आशियाई स्पर्धा २०१८ : लांब उडीमध्ये नीना वराकिल हिने पटकाविले रौप्यपदक

जकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज नवव्या दिवशी बॅडमिंटननंतर अॅथलेटिक्समध्ये खेळाडूंनी चांगली कामगिरी सुरू ठेवली आहे. आज अॅथलेटिक्समध्ये सुधा सिंग, धरूण आय्यासामी आणि नीरव चोप्रा यांनी दमदार कामगिरी केल्यानंतर महिलांच्या लांब उडी क्रीडाप्रकारात भारताला रौप्यपदक मिळाले आहे.

लांब उडी या क्रीडाप्रकारात नीना वराकिल हिने 6.51 मीटर लांब उडी मारत महिलांच्या गटात दुसरे स्थान मिळविले. दुसऱ्या स्थानासह तिने भारतासाठी रौप्यपदक पटकाविले आहे.

-Ads-

अॅथलेटिक्समध्ये भारताच्या नीरज चोप्रा याने भालाफेक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवित  सुवर्णपदक प्राप्त केले आहे.याआधी धरूण आय्यासामी या भारतीय खेळाडूने 400 मीटर अडथळ्यांची शर्यत या क्रीडाप्रकारात रौप्यपदक जिकूंन दिले आहे. तर दुसरीकडे महिला स्टीपलचेस 3000 मी. या प्रकारात सुधा सिंग हिने रौप्यपदक पटकाविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)