महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन पुरस्कार

नवी दिल्ली – महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी डी डी किसान वाहिनीने महिला किसान ऍवार्ड्‌स हा रिऍलिटी शो सुरू केला. या कार्यक्रमात महिला शेतकरी सहभागी होतील.

या शोमधील स्पर्धकांची निवड भारतीय कृषी संशोधन परिषदेने केली आहे. प्रत्येक भागात दोन महिला त्यांच्या कामगिरीबाबत माहिती देतील. परीक्षकांकडून त्यांचे मूल्यमापन केले जाईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या पाच स्पर्धक महिला अंतिम फेरीत पोहोचतील. यातून एका विजेत्याची घोषणा केली जाईल. या कार्यक्रमातून केवळ मनोरंजनच होणार नाही तर जनजागृतीही होईल. हा वास्तवावर आधारित रिलिटी शो आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)