अखेच्या सामन्यात महिलांचा परभव ; मलिकेत 2-1 असा विजय

  • तीनही सामन्यात गोलंदाज सामनावीर
  • फलंदजीची संधी मिळालेल्या दोन्ही सामन्यात मोना मेश्राम शुन्यावर बाद

मुंबई: कॅथरीन ब्रन्टच्या पाच बळीनंतर मधल्या आणि तळाच्या फलंदाजांनी केलेल्या जिगरबाज खेळीच्या जोरावर इंग्लंड महिला संघाने मलिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा 2 विकेट आणि 7 चेंडू राखून पराभव केला. मधल्या फळीतील फलंदाजाचे अपयश भारताच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले.कॅथरीन ब्रन्ट सामनावीर ठरली. 2021 विश्वचषकात थेट पात्रता मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेत भारताने पाहिले दोन सामने जिकंत चार गुण मिळवत मालिका आपल्या नावे केली होती; परंतु अखेरच्या सामन्यात विजय मिळवत इंग्लडच्या महिला संघाने दोन महत्त्वपूर्ण गुण मिळवले आहेत.

भारताने विजयासाठी दिलेल्या 205 धावांचे लक्ष्य घेऊन फलंदाजीस आलेल्या इंग्लड संघाने आश्वासक सुरुवात केली. त्यांच्या सलामीवीरांनी 25 धावांची भागीदारी केल्यानंतर एमी जोन्स आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाली. तिला झुलन गोस्वामीने 13 धावांवर बाद केले. त्यानंतर फलंदाजीस मैदानात आलेल्या लॉरेन विनफिल्डला 2 धावा जमविता आल्या. विनफिल्ड बाद झाल्यावर टॅमी बेअमॉण्ट 21 धावा करून माघारी परतली. तर दीप्ती शर्माने स्वतःच्याच गोलंदाजीवर नॅटली स्किव्हरचा एका धावेवर झेल टिपला आणि इंग्लडची अवस्था 4 बाद 40 अशी केली. साराह टेलर 2 धावांवर बाद झाल्यावर इंग्लडचा निम्मा संघ 49 धावत माघारी परतला होता. त्यानंतर कर्णधार हिदर नाईट आणि डॅनिएली वॅट यांनी डाव सावरला. हिदर नाईट 47 धावांवर बाद झाली. या दोघीमध्ये 69 धावांची भागीदारी झाली. नाईट बाद झाल्यावर वॅट आणि जॉर्जिया अल्विसने संयमी खेळी करत इंग्लडला विजयाची संधी निर्माण करून दिली. अखेरच्या पाच षटकांत इंग्लडला विजयासाठी 22 धावांची गरज होती. दबावाच्या वेळीही खेळात सुधारणा करत इंग्लडने हा सामना 7 चेंडू राखून जिंकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. कॅथरीन ब्रन्टने दुसऱ्याच चेंडूवर जेमिमा रॉड्रिग्जचा त्रिफळा उडवला. दुसऱ्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही जेमिमा भोपळाही फोडू शकली नाही. त्यानंतर स्मृती मंधना आणि पूनम राऊत यांनी भारताचा डाव सांभाळाला. त्यांनी इंग्लडच्या महिला गोलंदाजावर वर्चस्व गाजवताना दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली. दरम्यान मंधनाने मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक झळकाविले. भारताच्या 129 धावा झाल्या असताना ब्रन्ट पुन्हा गोलंदाजीस आली आणि तिने मंधनाला झेलबाद केले. मंधना बादझाल्यावर धावसंख्येत दोन धावांची भर घालून पूनम राऊतही मघारी परतली. मंधनाने 66 धावांची खेळी केली तर राऊतने 56 धावा चोपल्या. त्यानंतर मोना मेश्राम पुन्हा शून्यावर बाद झाली. मागील दोन सामन्यांत चमकदार कामगिरी करणाऱ्या मिताली राजला या सामन्यात चमक दाखवता आली नाही. ब्रन्टने तिला 7 धावांवर बाद केले. भारताने 11 धावांत 4 फलंदाज गमवाल्याने भारताची स्थिती 5 बाद 140 अशी झाली. तानिया भाटिया आणि झुलन गोस्वामी अनुक्रमे शून्य आणि एका धावेवर बाद झाल्याने भारताचे स्थिती 1 बाद 129 वरून 7 बाद 150 अशी झाली. नियमित अंतराने बळी जात असताना दीप्ती शर्मा आणि शिखा पांडेने भारताचा डाव सावरला. त्यांच्या भागीदारीमुळे भारताला 200 धावांचा टप्पा गाठता आला. शिखा 26 धावा करून बाद झाली. दीप्ती शर्मा27 तर पूनम यादव 3 धावांवर नाबाद होत्या. इंग्लंडसाठी कॅथरीन ब्रन्टने पाच बळी घेतले.

धावफलक- भारतीय महिला संघ 8 बाद 205: जेमिमा रॉड्रिग्ज (0), स्मृती मंधना (66), पूनम राऊत (56), मिताली राज (7), मोना मेश्राम (0), तानिया भाटिया (0), झुलन गोस्वामी (1), शिखा पांडे (26), दीप्ती शर्मा 27 आणि पूनम यादव 3 नाबाद
इंग्लडमहिला संघ 8 बाद 208: एमी जोन्स (13), टॅमी बेअमॉण्ट (21), लॉरेन विनफिल्ड (2), नॅटली स्किव्हर (1), साराह टेलर (2), हिदर नाईट (47), डॅनिएली वॅट (56), कॅथरीन ब्रन्ट (18), जॉर्जिया अल्विस (33)आणि अन्या श्रबसोल नबाद 4.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)