पुणे – आझम स्पोर्टस अकादमीच्या वतीने पाचव्या आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेतील अ गटात मध्यप्रदेश, पंजाब व हेमंत पाटील क्रिकेट अकादमी, ब गटात हरयाणा, राजस्थान सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटना, क गटात युबीसी, वूमन्स स्पोर्टस अकादमी, वेरॉक स्पोर्टस अकादमी तर ड गटात पुणे जिल्हा क्रिकेट संघटना, आझम स्पोर्टस अकादमी व हेमंत किणीकर स्पोर्टस अकादमी संघांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेत सुमारे 150 महिला खेळाडू सहभागी होत आहेत. स्पर्धेतील सर्व लढती 20 षटकांच्या होणार असून चारही गटातील अव्वल संघ थेट उपांत्य फेरीत दाखल होणार आहे.
स्पर्धेचे उदघाटन 13 मे रोजी सकाळी 10 वाजता एमसीई सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीई सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम यांच्यासह संस्थेचे इतर मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती आझम स्पोर्टस अकादमीचे संचालक गुलजार शेख यांनी दिली.