महिला आयोगाकडून तनुश्रीच्या तक्रारीची दखल 

मुंबई: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. तनुश्री दत्ताने तिच्या वकिलांमार्फत महिला आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी तनुश्री दत्ताने स्वत: महिला आयोगासमोर उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश आयोगाने दिले आहेत. 

तनुश्री दत्ताच्या तक्रारीत उल्लेख असलेल्या अभिनेते नाना पाटेकर, गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना आयोगाने नोटीस बजावली असून पुढील 10 दिवसांत आपले म्हणणे आयोगाकडे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. 

तनुश्री दत्ताने आयोगाकडे दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत मुंबई पोलिसांकडे सदर प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत मुंबई पोलिसांकडून अद्याप काय कार्यवाही करण्यात आली याचा अहवालही आयोगाने मागविला आहे. 

चित्रपटसृष्टीतील अशा घटना रोखण्याची जबाबदारी ही निर्माते, दिग्दर्शक तसेच संबंधित संघटनांची देखील आहे. महिलांबाबत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच तक्रार करण्यासाठी यंत्रणा असणे आवश्‍यक आहे. यादृष्टीने कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा, 2013 या कायद्यानुसार सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने तात्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती (आयसीसी कमिटी) स्थापन करावी, असे निर्देश महिला आयोगाने सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)