महिला T20 क्रिकेट : क्रमवारीत आॅस्ट्रेलिया अव्वल तर भारतीय संघ पाचव्या स्थानावर

नवी दिल्ली – आयसीसीने नुकतीच महिला टी20 क्रिकेटमधील संघाची नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. महिला क्रिकेट टी20 क्रिकेट प्रकारात आॅस्ट्रेलियन महिला संघ 280 गुणांसह प्रथम स्थानावर आहे.

क्रमवारीत न्यूझिलंड महिला संघ 277 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा महिला संघ असून न्यूझिलंड महिला संघाच्या एकूण गुणापेक्षा केवळ एका अंकाने मागे आहे. इंग्लंड संघाचे एकूण गुण 276 आहेत.

वेस्ट इंडिज महिला संघ 259 गुणांसह चौथ्या स्थानावर तर त्या पाठोपाठ भारतीय महिला संघ 249 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यानंतर साउथ आफ्रिका (243),पाकिस्तान (227), श्रीलंका(207) , बांगलादेश (193) आणि आर्यंलंड (188) गुणासह अनुक्रमे सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)