शबरीमलाप्रमाणे मशिदीतही महिलांना प्रवेशाची याचिका फेटाळली 

संग्रहित चहाचित्र
कोची: शबरीमला मंदिरामध्ये ज्याप्रमाने महिलांना प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले, त्यानुसार मशिदींमध्येही महिलांना प्रवेश देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारी जनहित याचिका केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. केरळमधील हिंदू संघटनेने ही याचिका केरळ उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. या प्रकरणी याचिकाकर्ते हे पीडीत नाही किंवा कोणत्याही अर्थाने त्यांच्या अधिकारांचा भंगही होत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
अखिल भारत हिंदू महासभेचे केरळमधील अध्यक्ष स्वामी दत्तात्रेय साई स्वरुप नाथ यांनी ही याचिका दाखल केली होती. शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात महिलांना प्रवेशास असलेली बंदी उठवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले होते. त्याचप्रमाणे मुस्लिम महिलांनाही मशिदीमध्ये प्रार्थनेसाठी प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. मुस्लिम महिलांना मशिदींमध्ये प्रवेश नाकारणे हे राज्यघटनेतील समानतेच्या हक्कांचे उल्लंघन आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)