दारूबंदीसाठी महिलांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

पाथर्डी – सोमठाणे नलवडे येथील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी करत गावातील महिलांनी पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गावात दारूड्यांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे परगावातील पाहुणे गावात आल्यावर ग्रामस्थांना माना खाली घालाव्या लागतात. दारूड्यांचा महिला व मुलींना त्रास होत आहे. दारूपाई अनेकांचे प्रपंच उद्‌ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावातील दारू व्यवसायावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी विमल काकडे, मंदा आवारे, शेषाबाई कासुळे, शारदा काकडे, आशा वाघ, गीता वावरे, वैशाली बडे, संगीत वाघुंबरे, आशा बढे व गावातील महिलांसह सरपंच रामदास काकडे, उपसरपंच अमोल नलवडे, उत्तम नलवडे, सुधाकर नलवडे, शिवनाथ उनबेग, रवींद्र कासुळे, आदिनाथ नलवडे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रत्नपारखी यांनी दारू विक्रेत्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)