बस-पिकअपच्या अपघातात महिला ठार

15 प्रवासी जखमी ः पांढरीपूल येथे अपघाताचे सत्र सुरूच

नगर –
नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल येथे शुक्रवारी (दि.19) पहाटे पाच वाजेच्या दरम्यान लक्‍स्झरी बस व पिकअपच्या अपघातात एक महिला ठार झाली, तर 10 ते 15 प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

याबाबत महिती अशी की, नगरहून औरंगाबादकडे जाणाऱ्या लक्‍झरीबसने (क्र. एएच 20 डीडी- 0508) उभ्या असलेल्या पिकअप (क्र. एएच- 14 डीए- 3643) जोराची धडक दिली. यात बस उलटली. त्यात बसमधील प्रमिला विशाल शिरवाळे (वय-28. रा. नेरूळ, नवी मुंबई) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती विशाल दादू शिरवाळे व मुलगा जतन विशाल शिरवाळे हे जखमी झाले असून, त्यांच्यासह 10 ते 15 प्रवासी जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले आहे. नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरीपूल परिसरात अपघाताचे सत्र सुरू असून काल गुरुवार 18 एप्रिल रोजी सकाळी आकरा वाजता तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात एक महिला गंभीर जखी झाली होती. त्यात हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)