महिलेवर झाडली गोळी…

नवी दिल्ली : दिल्ली येथील भारत नगर परिसरात काल रात्री एका इसमाने २४ वर्षीय महिलेवर गोळी झाडली. त्या इसमाला पोलिसांनी पाकडे असून या कृत्यामागील कारण हे तरुणीने तोडलेले प्रेमसंबंध आहेत, अशी माहिती आज पोलिसांनी दिली.

ते दोघे एकमेकांवर प्रेम करत होते. परंतु महिलेने त्याच्यासोबतच आपले नाते तोडले. नातेवाईकांकडे राहत असलेली ती महिला चारटेर्ड अकाउंटन (सनदी लेखापाल) आहे. कामासाठी घरातून निघताना त्या इसमाने तिच्यावर गोळी झाडली. त्यानंतर लगेच तिथे घरातील मंडळी पोहचली आणि त्यांनी तिला इस्पितळात हलवले.

-Ads-

महिलेच्या जीवाला धोका नसून तिची तब्बेत सध्या सुधारत आहे.  त्या इसमाला शाहदारा येथून पकडण्यात आले असून तो जागरण मंडळ येथे काम करतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)