डबलिन – सलामीवीर शाइ होप आणि जेसन होल्डर यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने तिंरगी एकदिवसीय मालिकेच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशसमोर 248 धावाचं आव्हान ठेवलं आहे.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारत 50 षटकांत 9 बाद 247 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. वेस्ट इंडिजकडून शाइ होपने सर्वाधिक 87 आणि जेसन होल्डरने 62 धावा केल्या. बांगलादेशकडून गोलंदजाीत मुस्तफ़िज़ुर रहमानने सर्वाधिक 4 तर मशरफे मुर्तजाने 3 गडी बाद केले.
Bangladesh need 248 runs to win.#BANvWI #RiseOfTheTigers pic.twitter.com/BrQjLgejp8
— Bangladesh Cricket (@BCBtigers) May 13, 2019
दरम्यान, वेस्टइंडीज आणि बांगलादेश हे संघ आयर्लंड दौऱ्यावर असून आयर्लंड, बांगलादेश आणि वेस्ट इंडीजदरम्यान तिरंगी वनडे मालिका सुरू आहे.