संभाजी भिडे न्यायालयात हजर झाल्याशिवाय युक्तीवाद करू नका

फिर्यादींच्या वकीलांचा न्यायालयात युक्तीवाद

पुणे – कोरेगाव-भिमा दंगलप्रकरणी गुन्हा दाखल असलेले संभाजी भिडे जोपर्यंत न्यायालयात हजर होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला युक्तीवाद करता येत नसल्याचा पवित्रा फिर्यादींच्या वकीलांनी घेतल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी भिडेंचे वकील अॅड. पुष्कर दुर्गे यांना लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, फिर्यादींच्या वकीलांनी असा आक्षेप घेतल्यानंतर अॅड. दुर्गे यांनी न्यायालयाला सांगितले की, तब्बल एक वर्षापासून याप्रकरणात मी काम पाहात असून तेव्हाच आक्षेप का घेतला नाही असा सवाल उपस्थित केला. नुकतीच या प्रकरणाची सुनावणी झाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)