सत्तांतराशिवाय गत्यंतर नाही ः उदयनराजे

उंब्रज – देशाला ज्या लोकांनी संकटात घातले, “मन की बात’च्या माध्यमातून अनेक आश्‍वासन देऊन फसवले. त्याच्यावर विश्‍वास ठेऊन जनतेने बहुमत दिले. त्या सरकारनेच देशाचे वाटोळे केले. त्यामुळे सत्तांतराशिवाय गत्त्यंतर नाही, असे मत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी यांनी व्यक्त केले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार म्हणून खा. उदयनराजे भोसले निवडणूक लढवत आहेत. त्यानिमित्ताने उंब्रज येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, कॉंग्रेसचे सयाजीराव पाटील, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, गंगाधर जाधव संजय थोरात माणिकराव पाटील, भास्करराव गोरे, डी. बी. जाधव, रमेश मोहिते जि. प. सदस्य विनिता पलंगे, पंचायत समिती सदस्य सुषमा नागे, अजितराव पाटील चिखलीकर, सरपंच लता कांबळे, उपसरपंच अजित जाधव, सदस्या मीनाक्षी पोळ, डॉ. आशा जगताप, हंबीरराव पाटील, सोमनाथ जाधव, संपतराव जाधव, डी. बी. जाधव, समीर जाधव, प्रा. मच्छिंद्र सकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार श्री. छ. उदयनराजे पुढे म्हणाले, लोकशाहीतील मतदारराजाने स्वतःपेक्षा 10 पटीने ज्या सरकारवर विश्‍वास ठेवला, त्याला हे सरकार पात्र राहिले नाही. त्यांनी देशाचा अक्षरशः नरक करुन ठेवला आहे. लोकांच्यात नैराश्‍य निर्माण केले. शेतकरी आणि शिक्षित युवकांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले. अशा सरकारला परत लोकांसमोर जाताना लाज कशी वाटत नाही? तुम्ही दुसऱ्याच्या कुटुंबात लक्ष घालता अगोदर तुमचे स्वतःचे कुटुंबाकडे बघा. मतदानाची ताकद तुमच्यात असताना तुम्ही गप्प बसू नका.

जे सरकार तुम्हाला चिरडते. त्यांना घरी घालवा. गेल्या पाच वर्षांत या सरकारने सत्तेचे केंद्रीकरण केले आहे. फक्त नावालाच लोकशाही असून यांनी हुकुमशाही राजवट आणण्याचे धोरण आखले आहे. जे तुमच्या मुळावर उठलेत त्यांचा बंदोबस्त करा. सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. परिवर्तन झाले तरच आशेचा किरण आहे. रशियासारखी आपल्या देशाची अवस्था होता कामा नये, यासाठी सत्ताधारी सरकारला खाली खेचा.आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, आजवर कॉंग्रेसच्या माध्यमातूनच देशाचा विकास झाला आहे. खरी लोकशाही कॉंग्रेसनेच आणली आहे.

सध्याच्या सरकारने केलेल्या अनेक घोषणा खोट्या असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. लोकांची मागणी एक आणि निर्णय दुसरेच घेण्याची या सरकारची प्रवृत्ती आहे. तुम्ही स्वतःला चौकीदार म्हणता मग राफेलची फाईल गायब कशी झाली. यापुढे देशात कॉंग्रेस विचाराचेच सरकार येईल. यावेळी प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांचेही भाषण झाले.प्रास्ताविक कृष्णत जाधव यांनी, तर सुधाकर जाधव यांनी आभार मानले. या सभेस हंबीरराव जाधव रमेश मोहिते, संजय साळुंके, अंकुश हजारे, जयवंतराव साळुंके, उत्तमराव अर्जुगडे, गोपाळराव येळवे, संदीप भोसले, चिमणदादा कदम, शहाजीराव चव्हाण, संजय कदम, सोमनाथ जाधव यांच्यासह परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)