बनावट आदेशाने वाळू ट्रक सोडल्याप्रकरणी

तहसीलदारांची म्हसवड पोलिसांना नोटीस

गोंदवले – बनावट आदेश बनवून वाळुचा ट्रक सोडण्याच्या प्रकरणांच्या चौकशीचे आदेश प्रांताधिकारी यांनी तहसिलदारांना दिले असून तहसीलदारांनी म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना हा ट्रक कोणत्या आदेशान्वये सोडून दिला, याबाबत लेखी खुलासा समक्ष सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

म्हसवडच्या तलाठ्यांनी 16 जुन रोजी एमएच 12 – एमव्ही 9095 हा क्रमांक असलेला व 4 ब्रास वाळुने भरलेला ट्रक जठरेवस्ती – देवापुर रस्त्यावर विरकरवाडी चौका जवळ पकडला होता. हा ट्रक मालकांने तहसीलदारांचा आदेश असल्याने सोडून दिल्याचे सांगितले असले तरी तो आदेश बनावट असल्याचे दै. प्रभातने पुराव्यानिशी छापले होते.

या ट्रकवर कोणतीही कारवाई तहसीलदारांनी केली नसून हा ट्रक म्हसवड पोलीस स्टेशनमध्ये 16 जुन रोजी तलाठ्यांनी जमा केला होता. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार जयश्री आव्हाड यांना प्रांताधिकारी यांनी दिले आहेत. ज्या आदेशाने पोलिसांनी ट्रक सोडला तो आदेश पुर्णपणे बनावट असून त्यापुर्वी एका अधिकृतपणे सोडलेल्या ट्रकच्या आदेशाची कॉपी केल्याचे दिसून येत आहे.

हा बनावट आदेश महसुलने? की पोलीसांनी का ट्रक मालकांने बनवला याबाबत गुढ निर्माण झाले आहे. तहसीलदारांनी म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना या प्रकरणी नोटीस बजावून हा ट्रक कोणत्या आदेशाने सोडून दिला, याबाबत लेखीखुलासा नोटीस मिळाले पासुन 24 तासात समक्ष सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात महसुल दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)