अकोल्यात तीन नगरसेवकांसह 28 जुगारी अटकेत

अकोला: अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत तब्बल 28 जुगारींना अटक करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे यात अकोट नगरपालिकेतील तीन नगरसेवकांसह एका नगरसेविकेच्या मुलाचा समावेश आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी ही कारवाई केली.

अटकेतील जुगारी नगरसेवकांमध्ये मुख्तार रवान अय्युब खान, सलीम नबीउल्ला खान, आरिफ मारुफ यांच्यासह नगरसेविकापुत्र मनोज चंदन यांचा समावेश आहे. तर जितेंद्र चंडालिया हा माजी नगराध्यक्षांच्या कुटुंबातील आहे. याशिवाय इतर आरोपींमध्ये अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील काही मोठ्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

-Ads-

अकोट शहरातील अंजनगाव मार्गावरील माऊली मनोरंजन केंद्रावर हा गोरखधंदा सुरु होता. ही कारवाई संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सुरु झालेली रात्री उशिरापर्यंत चालली. या कारवाईत पोलिसांनी 50 हजारांच्या रोख रकमेसह सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फरार झालेल्या इतर आरोपींच्या अटकेनंतर जुगारी आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)