राहुल गांधी भगिनीसह सिमला दौऱ्यावर

सिमला: पाच राज्यांतील निवडणूक निकालाच्या धामधुमीनंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे आपल्या भगिनी प्रियांका गांधी आणि त्यांच्या मुलांसमवेत सिमला येथे पर्यटनासाठी गेले आहेत. हिमाचल प्रदेशात छराबरा येथे प्रियांका गांधी वढेरा यांचे एक घर बांधले जात आहे. त्या घराच्या बांधकामाचीही ते तेथे पहाणी करणार आहेत. काल मंगळवारी ते येथे मोटारीने दाखल झाले.

वाटेतील प्रवासात ते सोलन येथे धाब्यावर काही काळ चहासाठी थांबले होते. त्यावेळी त्यांच्या आगमनाची माहिती मिळताच स्थानिक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी तेथे गर्दी केली होती. त्यांच्याशी चर्चा करून नंतर ते पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. त्यांचा सिमला येथील सुट्टीचा कालावधी किती दिवसांचा आहे याची माहिती मात्र मिळू शकली नाही. स्वत: राहुल यांनीच आपल्या सिमला दौऱ्याची काही छायाचित्रे सोशल मिडीयावर शेअर केली आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)