राहुल गांधींसोबत राफेल बाबत बोलणेच झाले नाही : पर्रीकर यांचा निर्वाळा

पणजी : राहुल गांधी यांनी काल गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची विधानसभा परिसरामध्ये भेट घेतल्यानंतर त्यांनी काही तासांमध्येच केरळ येथे काही कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना राहुल गांधी यांनी पर्रीकर यांच्यासोबत राफेल बाबत बोललो असता ‘त्यांनी (पर्रीकरांनी) आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठी केलेल्या ‘नव्या राफेल कराराशी’ संबंध नसल्याचे सांगितले.’ असं राहुल म्हणाले होते. राहुल यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये एकाच खळबळ उडाली होती. मात्र आता गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वतः याबाबत वक्तव्य करत राहुल यांचा दावा खंडित केला आहे.

पर्रीकर यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याला खोटं ठरवताना राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या कालच्या ५ मिनिटांच्या भेटीमध्ये राफेल कराराबत कोणतेही बोलणे झाला नसल्याचा निर्वाळा मनोहर पर्रीकर यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्रीकर यांच्या दाव्यामुळे राहुल गांधी यांच्या कालच्या वक्तव्याबत संभ्रम निर्माण झाला असून नक्की राहुल गांधी खरे सांगत आहेत की मनोहर पर्रीकर असा प्रश्न निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)