भारताच्या प्रयत्नांना आमची साथ : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन: मुंबईवर 26/11 ला झालेल्या हल्ल्याच्या संबंधात भारताला अजून न्याय मिळालेला नाही या विषयात आम्ही त्यांच्या बरोबर आहोत असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. या हल्ल्याला कालच दहा वर्ष पुर्ण झाली त्यानिमीत्ताने प्रसारीत केलेल्या एका ट्विटर संदेशात त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की या हल्ल्यात जे 166 नागरीक ठार झाले आहेत त्यात सहा अमेरिकन नागरीकही होते. आम्ही दहशतवाद्यांना कधीही जिंकू देणार नाहीं. किंवा त्यांना विजयाच्या जवळसुद्धा येऊ देणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे.

काल अमेरिकेतील भारतीय दूतावासातही या हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी अनेक अमेरिकन अधिकारीही उपस्थित होते. हल्ल्याला जबाबदार असलेल्या सर्वांना पकडून न्यायापुढे खेचावे असे आवाहन यावेळी पाकिस्तानला करण्यात आले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)