परिस्थितीचा सखोल आढावा घेऊनच पुढची दिशा ठरवली पाहिजे : शत्रुघ्न सिन्हा

जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० जवानांना आपला प्राण गमवावा लागला होता. पुलवामा हल्ल्यामुळे सध्या देशभर संतापाची लाट असून सतत भारताच्या कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानप्रती मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष खदखदत असल्याने पाकिस्तानला आता त्यांच्याच भाषेमध्ये उत्तर देण्याची गरज असल्याची भावना देशवासियांमध्ये आहे. या हल्याबाबत प्रत्येक क्षेत्रातून निषेध दर्शविला जात आहे. यातच ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हायांनी पुलवामा हल्ल्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

आपण या हल्ल्याबाबत  प्रत्युत्तर प्रत्येक बाबींची काळजी घ्याल हवी. ‘जोश’मध्ये ‘होश’ हरवून बसणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. देशभर संतापाची लाट पसरलेली आहे.  त्यामुळे संतापाच्या भरात काही पाऊल उचलण्याऐवजी आपण सगळ्या परिस्थितीचा सखोल आढावा घेऊनच पुढची दिशा ठरवली पाहिजे.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)