#MakranCupBoxingTournament2019 – मनीष कौशिक सहित तीन भारतीय बाॅक्सर उपांत्यफेरीत

पुणे – भारतीय बाॅक्सर मनीष कौशिक (60 किलो) यांच्यासहित अन्य तीन भारतीय बाॅक्सर हे ईराण येथील चाबहारमध्ये होत असलेल्या माकरान कप बाॅक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यामुळे भारताचे स्पर्धेत 4 पदके निश्चित झाली आहेत.

रविवार झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत मनीष कौशिक याने सलार मोमिवांड याचा 5-0 ने पराभव केला. तर दुसरीकडे दुर्याेधन नेगी, रोहित टोकस या भारतीय बाॅक्सरांनीसुध्दा आपपल्या वजनी गटात प्रतिस्पर्धीं खेळाडूचा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अशाप्रकारे स्पर्धेत पदक निश्चित केलेल्या भारतीय बाॅक्सर खेळाडूंची संख्या ही आठवर पोहचली आहे. सतीकुमार (91 किलो +), मंजीत सिंह पंघाल (75 किलो), संजीत (91 किलो), ललित प्रसाद (52 किलो), आणि दिपक (49 किलो) या खेळांडूनी शनिवारीच स्पर्धेतील उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

https://twitter.com/BFI_official/status/1099987509138866176

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)