बारामती जिंकण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांना शुभेच्छा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्‍तव्यावर प्रत्युत्तर

पुणे – “लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघासह राज्यात 43 जागा जिंकायच्या आहेत,’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला “असे वक्तव्य करणाऱ्यांना माझ्याकडून शुभेच्छा,’ खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. यावेळी त्यांनी “गेल्या वेळेला राज्यात 42 जागा मिळाल्या होत्या. यंदा आपल्याला 43 जागा मिळाल्या पाहिजेत आणि 43 वी जागा ही बारामतीची जिंकायची आहे,’असे म्हटले होते.

बारामती लोकसभा मतदार संघ हा शरद पवार यांचा पारंपारिक मतदार संघ आहे. येथून ते कधीही पराभूत झाले नव्हते. यांच्यानंतर आता त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या गेले दोन टर्म या मतदार संघातून विजयी होत आहेत. गेल्या वेळेला मोदी लाटेमध्ये त्यांनी आपली जागा राखली असली, तरी त्यांचे मताधिक्‍य मोठे घटले होते. त्यामुळे यावेळेला “बारामतीमध्ये गेल्या वेळी झालेल्या चुका करायच्या नाहीत. कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची आणि ती जिंकूून आणायची,’ अशी व्युहरचना भाजपने केली आहे. या पार्श्‍वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी रविवारी उत्तर दिले.

टाटा ट्रस्ट, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या तसेच मेंटर्स फाउंडेशनच्या विद्यमाने खडकवासला, हवेली, भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर तालुक्‍यातील शालेय विद्यार्थीनी व आशा वर्कर्स यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या.

सुळे म्हणाल्या, ” परिवारवाद हा कुठल्या पक्षात नाही? सगळीकडेच आहे. ज्यांनी हे आरोप केले आहेत, त्यांच्या पक्षातसुद्धा परिवार वाद आहेच की. त्यामुळे मला याबाबत काही विशेष वाटत नाही. सोबतच प्रियांका गांधी या सक्षम आहेत. त्यांचा अभ्याससुद्धा चांगला आहे. बोलण्याची कला त्यांना अवगत आहे. मी स्वत: त्यांना व्यक्तिगत जवळून ओळखते. कॉंग्रेसला त्यांचा चांगला फायदा होईल,’ असे ही सुळे यांनी सांगितले.

दरम्यान, शरद पवार म्हणाले, “दरवर्षी फक्त मुलींना सायकल वाटप केल्या जातात. मुलांवर अन्याय का? पुढच्या वर्षापासून गरीब मुलांना सुद्धा काही प्रमाणात सायकल वाटल्या पाहिजेत. याप्रसंगी 6 हजार सायकलीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन नगरसेवक प्रकाश कदम आणि युवा नेते प्रतीक कदम यांनी केले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)