#BANvWI 1st T20 : वेस्टइंडिजचा बांगलादेशवर दणदणीत विजय

सिल्हेट – शेल्डन काॅटरेलची शानदार गोलंदाजी आणि शाइ होपच्या आकम्रक फलंदाजीच्या जोरावर वेस्टइंडिजने बांगलादेशचा पहिल्या टी20 क्रिकेट सामन्यात 8 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह वेस्ट इंडिज संघाने तीन टी20 क्रिकेट सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 19 षटकांत सर्वबाद 129 धावांच करू शकला. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने 43 चेडूंत सर्वाधिक 61 धावा केल्या. शाकिब हसन वगळता अन्य कोणताही फलंदाज मैदानावर चांगली कामगिरी करू शकला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विजयासाठी 130 धावांचे आव्हान वेस्टइंडिजने केवळ 10.5 षटकांत गाठले. वेस्टइंडिजकडून फलंदाजीत शाइ होपने 23 चेंडूत 55 धावा केल्या. तर निकोलस पुरनने नाबाद 23 आणि कीमो पाॅलने नाबाद 28 धावा करत संघास विजय मिळवून दिला.

वेस्टइंडिजकडून गोलंदाजीत शेल्डन काॅटरेलने 4, कीमो पाॅलने 2 आणि कार्लोस ब्रेथवेट, फैबियन एलन ओशन थाॅमस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. शेल्डन काॅटरेल हा सामनावीर ठरला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)