#WIvENG Test : वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर 381 धावांनी विजय

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात राॅसटन चेजच्या गोलंदाजीच्या बळावर वेस्टइंडिजने इंग्लंडचा 381 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह वेस्टइंडिजने कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

दरम्यान वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 289 धावा केल्या होत्या. त्यानंतर पहिल्या डावात वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ अवघ्या 77 धावांतच आटोपला. वेस्टइंडिजकडून केमार रोचने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या तर जेसन होल्डर, अलजारी जोसेफने प्रत्येकी 2 आणि शैनन गेब्रिएलने 1 विकेट घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पहिल्या डावात 212 धावांची भक्कम आघाडी घेतल्यानंतर वेस्टइंडिजने दुसरा डाव 6 बाद 415 वर घोषित केला. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजकडून  शेन डाॅरेचने नाबाद 116 आणि जेसन होल्डरने नाबाद 202 धावा करत आपल्या संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली.

वेस्टइंडिजने इंग्लंडसमोर विजयासाठी 628 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र राॅसटन चेजच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा दुसरा डाव 246 धावांवरच आटोपला आणि इंग्लंडला 381 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

वेस्टइंडिजकडून गोलंदाजीत दुसऱ्या डावात राॅसटन चेजने 8 विकेट घेतल्या, तर शैनन गेब्रिएल आणि अलजारी जोसेफने प्रत्येकी 1 विकेट घेतली. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात रोरी जोसेफ बन बर्न्स याने सर्वाधिक 84 धावा केल्या. दुसऱ्या डावात नाबाद द्विशतकी खेळी करणारा जेसन होल्डर हा सामनावीर ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)