वायू वादळाचा तडाखा मुंबईलाही बसणार

मुंबई – वायू चक्रीवादळ जलदगतीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत या चक्रीवादळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच कच्छ, देवभूमी, द्वारका, पोरबंदर, जुनागढ, गीर, सोमनाथ, अमरेली आणि भावनगर जिल्ह्यांच्या सखल भागात 1 ते दीड किलोमीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितनुसार, मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये तसेच झाडांखाली उभं राहू नये कारण वायू वादळाचं संकट टळलं असलं तरी त्याचा परिणाम मुंबईत जाणवणार आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असून अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

“वायु’ चक्रीवादळामुळे उद्‌भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्य आणि केंद्रीय मंत्रालये/संस्थांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. गृह मंत्रालय संबंधित राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय संस्थांच्या नियमित संपर्कात आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 26 तुकड्या, बोटी, दूरसंचार उपकरणासह तैनात असून आणखी 10 तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. भारतीय तटरक्षक दल, नौदल, लष्कर आणि हवाई दलाने सज्ज राहण्यास सांगण्यात आले असून टेहळणी करणारी विमानं आणि हेलिकॉप्टर हवाई पाहणी करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)