पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार – शिरोळे

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे तिकीट कापण्यात आले असले तरी, आपण पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार असल्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत बोलताना शिरोळे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने आजवर जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. त्यांनी वेळोवेळी माझ्यावर टाकलेल्या या जबाबदाऱ्यांसाठी मी त्यांचा ऋणी आहे. या नंतरही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मी पक्षाचे काम करीत राहील. पुणे शहरात देखील पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने जास्तीत जास्त मतांनी पुण्याची जागा निवडून आणण्यासाठी मी कार्यरत असेल, असेही शिरोळे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान 2014 मध्ये गिरीश बापट यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने सुरवातीला काही दिवस बापट शिरोळे यांच्या प्रचारात उतरले नव्हते. त्यानंतर शिरोळे यांनी बापट यांच्या घरी जात त्यांची मनधरणी केली होती. आता बापट काय असणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)