#Video: विराट २०१४चा सूड उगवणार का??

आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. २०१४ नंतर प्रथमच भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. २०१४ च्या कसोटी मालिकेत भारताला ३-१ अश्या मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते.

२०१४च्या मालिकेत भारताच्या पराभवाचे मोठे कारण म्हणजे भारतीय बलाढ्य फलंदाजांना आलेले अपयश होते. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत मधल्या फळीतील सर्व जबाबदारी विराट कोहली याच्यावर होती. परंतु विराट या मालिकेत सपशेल अपयशी ठरल्याने भारताला या मालिकेत प्रभावी कामगिरीने करता आली नाही.
त्या मालिकेत विराट आपल्या कारकिर्दीतील सर्वात खराब कामगिरी करीत होता. त्याचबरोबर इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याच्या फलंदाजीतील उणिवा बाहेर आणल्या. उजव्या यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूंना खेळताना तो सतत बाद होत होता. जेम्स अँडरसन आणि स्टुवर्ट ब्रॉड त्याला मैदानावर टिकू देत नव्हते. पण सध्याचा विराट हा खूप बदलेला आहे. या वर्षीचा ‘क्रिकेटर ऑफ द इअर’ विराट टेस्टमध्ये खोऱ्याने धाव जमवतो आहे. ६६ कसोटीमध्ये त्याने ५३ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत.
मागील दौऱ्यात विराट आला होता तेव्हा त्याच्यासाठी इंग्लंडमधील वातावरण नवखे होते आणि तो देखील खूप प्रगल्भ झाला नव्हता. परंतु मागील काही वर्षातील त्याची कामगिरी पाहता आपणास सहज लक्षात येईल की तो या वेळी मागील पराभवाचे उट्टे काढण्यास सज्ज आहे.
स्क्रिप्ट: राजकुमार ढगे
व्हिडीओ: प्रशांत शिंदे
VO: अमोल कचरे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)