विद्या बालन करणार मायावतींची भूमिका?

बॉलिवूडमध्ये राजकीय व्यक्तींवर चित्रपट बनविण्याचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. डॉ. मनमोहन सिंह, बाळासाहेब ठाकरे, एनटी रामराव, नरेंद्र मोदी आणि जयललिता यांच्यासोबत आता आणखी एका राजकीय व्यक्तीचे नाव जोडले जाणार आहे. माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, मायावती यांच्यावर चित्रपट बनविण्यात येणार असून याचे दिग्दर्शन सुभाष कपूर करण्याची शक्यता आहे. तर मायावतींच्या भूमिकेत विद्या बालन झळकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, सुभाष कपूर यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

दरम्यान, मायावतींच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेची विद्या बालनला मोठी संधी आहे. ती सध्या एका वेबसिरीज मध्ये काम करत असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)