धरणग्रस्तांचे प्रश्‍न सुसंवादातून सुटतील : ना. चंद्रकांतदादा

कोयनानगर  – धरणग्रस्तांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी व शंभर टक्के विकसनशील पुनर्वसन करण्यासाठी प्रकल्पग्रस्त व शासनामध्ये संघर्ष नव्हे तर तर सुसंवाद असावा. संवादातून प्रकल्पग्रस्तांचे अनेक किचकट प्रश्‍न सूटण्यास मदत होतील, असे प्रतिपादन महसूल व पुनर्वसनमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी केले.

वांग-मराठवाडी प्रकल्पग्रस्तांना जमिनीऐवजी रोख रक्कम 17 लाख 12 हजार 160 रुपये व धरणाच्या बुडीत क्षेत्रात वर सरकून गावठाण निर्णयाप्रमाणे आज प्रकल्पग्रस्त खातेदारांना थेट पुनवर्सन व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील व महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या हस्ते भूखंडांचे 7/12 वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, कराड प्रांताधिकारी हिम्मत खराडे, भाजपाचे प्रांतिक सदस्य भरत पाटील, कार्यकारी अभियंता हिरे, तहसीलदार राजेश चव्हाण, जनजागर प्रतिष्ठानचे सह राज्य समन्वयक देवराज देशमुख, सातारा जिल्हा समन्वयक अमित कदम, सांगली जिल्हा समन्वयक जगन्नाथ विभुते, वांग मराठवाडी मुख्य संघटक जितेंद्र पाटील, खोडजाईवाडी सरपंच संभाजी मांडवे, उरमोडी मुख्य संघटक मिराजी जांभळे, नागेवाडी, वांग मराठवाडी, धोम कण्हेर, खोडजाई वाडी, कोयनाप्रकल्पातील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने
उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सरकारकडून पहिल्यांदाच वांग-मराठवाडीमध्ये जमिनीच्या मोबदल्यात जमीन अथवा पैशाचे वाटप केले आहे. शासनाने राज्यातील इतर प्रकल्पातील बाधितांनाही हाच नियम लागू करण्याचे धोरण ठरवले असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या गावात या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन केले जाईल त्या पुनर्वसित गावाची राज्यातील एक आदर्श गावठाण म्हणून निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुनर्वसनाबाबत शासन सकारात्मक

पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी पाटण तालुक्‍यातील कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत शासनाने सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे 70 वर्षात न सुटलेला प्रश्‍न सुटला आहे.कोयनेचे सर्वेक्षण, स्टेटस रिपोर्ट, संकलन, पात्र-अपात्र यादी तयार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)