भारतीय संघ मालिका वाचवणार का?

बेंगळूर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन टी- 20 सामान्यांच्या मालिकेतील पहिला सामना ऑसट्रेलियाने जिंकला. त्यामुळे दुसरा आणि मालिकेतील अखेरचा सामना जिंकून महिला बरोबरीत सोडवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे.

पहिल्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारताला कडवे आव्हान देईन याचा विचारही केला जात नव्हता; परंतु घरच्या खेळपट्टयांवर भारताची बलाढ्य फलंदाजी पुन्हा ढासळली आणि सामना जिंकण्यासाठी पुरेशा ठरतील इतक्‍या धावा बनविण्यातही भारताला अपयश आले. त्यामुळे भारतीय संघाला सामना गमवावा लागला. दुसरा सामना जिंकायचा असेल तर भारताला फालंदाजीमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. मागील काही वर्षातील भारतीय फलंदाजांची कामगिरी पहिली तर रोहित शर्मा, शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारतासाठी जास्तीत जास्त धावा जमविल्या आहेत. हे आघाडीची फलंदाज नेहमीच चांगल्या भरात राहिले आहेत. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाजावर जास्त दडपण आले नाही आणि जेव्हा आघाडीची फळी अपयशी ठरली तेव्हा भारतीय संघाने सामने गमावले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑस्ट्रेलियाच्या परदेशी दौऱ्यात मधल्या फळीत धावा करण्याची जबाबदारी महेंद्रसिंग धोनीने घेऊन सामने जिंकून दिले होते. परंतु, त्याची कामगिरी एकदिवसीय प्रकारात होती. वाढत्या वयामुळे त्याच्या खेळाला मर्यादा आल्या असून तो पहिल्या चेंडूपासून मोठे फटके खेळताना दिसत नाही. तो प्रथम स्थिरावण्यास वेळ घेतो आणि नंतर मोठे फटके खेळतो. पहिल्या टी- 20 सामन्यात त्याची संथ खेळी संघासाठी डोकेदुखी ठरली होती. त्यामुळे त्याने चेंडू आणि धावा यांचे योग्य ते गणित लक्षात घेत खेळी करणे गरजेचे आहे.

लोकेश राहुलने अर्धशतकी खेळी करत निवड सार्थ ठरवली आहे. त्यामुळे आघाडीच्या फलंदाजसमोरील धावा बनविण्याचे दडपण थोडे कमी झाले आहे. रोहित शर्माने पाहिल्या सामन्यात निराशा केली होती. त्याच्याकडून भारताला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. विराट कोहलीला न्यूझीलंड विरुद्धच्या अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यात आणि संपूर्ण टी- 20 मालिकेत विश्रांती मिळाली होती. तो बाकी खेळाडूंपेक्षा ताजातवाना असून हा सामना बेंगळुरूच्या खेळपट्टीवर होणार आहे जेथे विराट रॉयल चॅलेंजर बेंगळुरूसाठी वर्षानुवर्षे खेळतोय. त्यामुळे हा सामना भारतीय संघ गमावणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. या सामन्यात शिखर धवनला संधी मिळली तर कोणत्या खेळाडूला विश्रांती मिळेल हे निश्‍चित नाही.

गोलंदाजीमाध्ये भारताची मदार ही जसप्रीत बुमराह आणि युझूवेंद्र चहल यांच्यावर असेल. तर मागील सामन्यात महागडा ठरलेल्या उमेश यादवचे संघातील स्थान धोक्‍यात येऊ शकते. ऑस्ट्रेलिया संघ या स्थितीतून मालिका गमावू शकत नाही. त्यामुळे ते योग्य रणनीतीनुसार मैदानात उतरतील आणि सामना जिंकून मालिकेत विजय मिळवणयाचा प्रयन्त करतील. फालंदाजीत ऍरॉन फिंच, डी. आर्सी. शॉर्ट आणि ग्लेन मॅक्‍सवेल वर यांच्यावर मदार असेल तर गोलंदाजीत कुल्टर नाईल आणि पेट कामिन्स संघाचाही धुरा सांभाळतील. फिरकीपटू ऍडम झाम्पा आणि नॅथन लायन या दोघांचाही संघात समावेश होऊ शकतो.

प्रतिस्पर्धी संघ
भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, ऋषभ पंत, महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, विजय शंकर, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्कंडे.
ऑस्ट्रेलिया – ऍरोन फिंच (कर्णधार), डार्सी शॉर्ट, पॅट कमिन्स, ऍलेक्‍स कॅरी, जेसन बेहेरेनडॉर्फ, नॅथन कुल्टर-नाईल, पिटर हॅण्डस्कोम्ब, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, ग्लेन मॅक्‍सवेल, ज्येह रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टोइनिस, ऍश्‍टॉन टर्नर, ऍडम झम्पा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)