बालेकिल्ल्याचा गड राखणार की भगवा फडकणार?

लोकांमध्ये उत्कंठा, सातारा व माढ्यात राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला : चार वाजेपर्यंत निकालाचे चित्र होणार स्पष्ट

सातारा –
लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी होणाऱ्या देशातील मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा असताना जिल्ह्यातील माढा आणि सातारा मतदारसंघांमधील निकाल काय व कसा लागतो, याची लोकांमध्ये उत्कंठा आहे. पक्षस्थापनेपासून राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे यावेळी प्रथमच दोन्ही लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेने कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे आपला बालेकिल्ला सुरक्षित ठेवण्यात राष्ट्रवादी यशस्वी होणार की बालेकिल्ल्यावर युतीचा भगवा फडकवणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

सातारा मतदारसंघात 9 उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख लढत राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले विरूध्द शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यात आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे, बळीराजा संघटनेचे पंजाबराव पाटील, शैलेश वीर यांना मिळणारी मते परिणामकारक ठरतील का, याची चर्चा आहे. सातारा मतदारसंघात एकूण 11 लाख 9 हजार 434 मतदान झाले आहे. शासकीय कर्मचारी व अधिकारी यांची पोस्टल आणि सैनिकांच्या ईटीबीपीएसच्या माध्यमातून मते गुरुवारी सकाळी 8 पर्यंत स्वीकारली जाणार आहेत. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पोस्टल, ईटीबीपीएस आणि ईव्हीएम मशिनच्या एकूण 23 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत.

शेवटच्या फेरीच्या मतांची घोषणा दुपारी 4 वाजेपर्यंत होणार असून तेव्हाच निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर सहा विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिनच्या प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅट मशिनच्या चिठ्ठ्या मोजल्या जाणार आहेत. प्रक्रिया क्‍लिष्ट असल्यामुळे अधिकृत निकाल व विजयी उमेदवाराची घोषणा रात्री उशिरा होणार आहे. खा. उदयनराजे यांच्या विरोधात मागील दोन निवडणुकांच्या तुलनेत युतीने नरेंद्र पाटील यांच्या रूपाने तगडा उमेदवार दिला. मागील दोन्ही निवडणुकीत केंद्रात व राज्यात कॉंग्रेस आघाडीचे सरकार होते. मात्र, यंदाच्या निवडणूकीत केंद्रात व राज्यात भाजप आघाडीचे सरकार आहे. परिणामी नरेंद्र पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दोन तर उध्दव ठाकरे यांनी एक सभा घेतली.

तसेच आ. शंभूराज देसाई, माजी आमदार मदन भोसले, नितीन बानुगडे-पाटील, महेश शिंदे, मनोज घोरपडे, दीपक पवार, अतुल भोसले आणि माजी आमदार दगडूदादा सपकाळ यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली. त्यामुळे खा. उदयनराजे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण करण्यास युती यशस्वी ठरली आहे. दुसऱ्या बाजूला खा. उदयनराजे यांच्यासाठी खा. शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ.बाळासाहेब पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी प्रचार यंत्रणा राबविली. त्यामुळे यंदा सातारा लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण पूर्णत: ढवळून निघाले. त्यामुळे निकाल काय व कसा लागेल, याची हूरहूर दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांनाही लागून राहिली आहे. माढा लोकसभा मतदारसंघात 31 उमेदवार रिंगणात आहेत. निवडुूकीतील प्रमुख लढत भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड. विजय मोरे यांना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)