लोकसभेत विलास मुत्तेमवार यांचा पत्ता होणार कट? 

नागपूर – 2014च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या विलास मुत्तेमवार यांना यंदा कॉंग्रेस संधी देणार नसल्याची शक्‍यता आहे. प्राथमिक चाचपणीत सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या विलास मुत्तेमवार यांचा पत्ता कट होणार असल्याचे समजते.विलास मुत्तेमवार ऐवजी बबनराव तायवाडे, प्रफुल गुडढे आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये आजपर्यंत ठाकरे म्हणजेच मुत्तेमवार असे समीकरण होते. विकास ठाकरेंसाठी मुत्तेमवार अनेक लढे लढले आणि मुत्तेमवारांचा गट शहरात मजबूत होता. याचे सर्वात मोठे कारण होते विकास ठाकरे यांची ग्राऊंड लेव्हलवरील ताकद. दोघांनीही आपल्या भूमिका आणि कामाचे नीट सीमांकन केले होते. पण प्राथमिक चाचपणीत मुत्तेमवारांचे नाव वगळून आता विकास ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली जात आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील कॉंग्रेसची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे “नवा गडी, नवा राज्य’ या नियमानुसार राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेत काही बदलही केले आहेत. स्थानिक स्तरावर निरीक्षकांकडून होणारी चाचपणी आणि त्यातून पुढे येणारी नावे प्रामुख्याने चर्चेला घेतील जात आहेत.

राजा बदलला असला, तरी नागपूरचे गटातटाचे राजकारण “जैसे थे’च आहे. विजय वडेट्टीवार हे निरीक्षक आहेत. त्यामुळे ही नावे जरी निरीक्षकांनी मुंबईच्या बैठकीत पुढे केली, तरी दिग्गजांचे म्हणणेही ऐकले जाणार आहे. दिग्गजांचे आपले एक स्थान असल्यामुळे, या प्राथमिक चाचपणीला फार महत्त्व देत नाही, अशी प्रतिक्रिया विलास मुत्तेमवार यांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)