डीपीडीसीची बैठक कराडला घेवू – पालकमंत्री शिवतारे 

कराड – कराडकडे काहीअंशी दुर्लक्ष झाले आहे. मात्र पालकमंत्री या नात्याने माझे कराड शहर व तालुक्‍यावर चांगलेच लक्ष आहे. कराड शहरासह तालुक्‍यातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी येणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक कराडला घेतली जाईल असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक, शिवसेनेचे पदाधिकारी व प्रकल्पग्रास्तांशीही त्यांनी चर्चा केली. पालकमंत्री शिवतारे म्हणाले, साताऱ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाचा व कराड येथील कृषी महाविद्यालयांचा प्रश्न निकालात निघाला आहे. त्याचबरोबर कराड विमानतळाच्या विस्ताराचा प्रश्न लवकरच सुटणार असून बाधितांना योग्य मोबदला देण्याची प्रक्रिया सुरु आहे. कराडमध्ये सध्या लक्ष देण्यासारखे विशेष काही नसल्यामुळे माझ्याकडून काही अंशी कराडकडे दुर्लक्ष झाले आहे. मात्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काही कार्यक्रमांचे नियोजन केल्यास मी नक्कीच वेळ देईन.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच सातारा येथे होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठकही कराडला घेता येथील . त्या निमित्ताने कराडवर लक्ष राहील आणि विविध विकासकामांवरही चर्चा करता येईल असेही ते म्हणाले.

दरम्यान, पत्रकारांशी चर्चा करण्यापूर्वी पालकमंत्र्यांनी भाजपा प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्याशी बराचवेळ कमराबंद चर्चा केली. मात्र या कमराबंद चर्चेमुळे शिवसेनेच्या मोजक्‍याच तीन उपस्थित पदाधिकाऱ्यांना दाराबाहेर ताटकळत रहावे लागले. शिवाय पालकमंत्र्यांच्या अन्य भेटीगाठी व चर्चेमुळे पक्षाच्या पालकमंत्र्यांना आपल्याच पदाधिकाऱ्यांना वेळ देता आला नाही; याची चर्चा मात्र उपस्थितांमध्ये चांगलीच रंगली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)