इंधनावरील करवाढ स्थगित करणार – फ्रान्सचे पंतप्रधान फिलिप

पॅरिस (फ्रान्स): फ्रान्सचे सरकार इंधनावरील प्रस्तावित करवाढ स्थगित करणार आहे. यासंबंधातील घोषणा पंतप्रधान एडवर्ड फिलिप बुधवारी करणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. 1 जानेवारीपासून लागू होणारी इंधन दरवाढ पिवळे जाकिटवाल्या आंदोलकांची देशव्यापी हिंसक आंदोलने थांबविण्यासाठी स्थगित करण्यात येत आहे. गेले दोन आठवडे इंधन करवाढी विरोधात देशभर तीव्र आंदोलने चाललेली आहेत. पॅरिसमध्ये या आंदोलनांचे रूपांतर हिंसाचारात आणि लुटालुटीत झाले होते.

इंधनावरील करवाढ स्थगित करण्याबरोबरच आंदोलकांना शांत करण्यासाठी अन्य काही उपाययोजना करण्यात येणार आहेत. इंधन दरवाढीविरोधात सुरू झालेल्या या आंदोलनाने फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉनविरोधी रूप धारण केले. कमी उत्पन्नवाल्या गटांना त्रासदायक धोरणे स्वीकारल्याबद्दल जनतेचा संताप उफाळून आला होता.

-Ads-

इंधनावरील करवाढ मागे घेण्याबरोबरच किमान वेतनात वाढ आणि उच्च उत्पन्नधारक गटावरील गेल्यावर्षी रद्द करण्यात आलेला संपत्ती कर पुन्हा लागू करावा या आंदोलकांच्या काही मागण्या होत्या. इंधन करवाढ स्थगित केली असली, तरी पंतप्रधान आंदोलकांच्या प्रतिनिधींची भेट घेणार नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)