“स्टूडंट ऑफ द इयर 2’मध्ये झळकणार विल स्मिथ

बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर याने “स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून आलिया भट्‌ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा या तिघांना लॉन्च केले होते. या चित्रपटाला चांगले यश मिळाले आणि या तिन्ही स्टार कलाकारांनी इंडस्ट्रीत आपले स्वतःचे स्थानही निर्माण केले आहे. आता करणने “स्टूडंट ऑफ द इयर 2’साठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे डायरेक्‍टर पुनीत मल्होत्रा यांनी नुकताच ट्रेलर प्रदर्शित केला होता. याप्रसंगी करण म्हणाला होता की, या चित्रपटातील “ये जवानी है दीवानी’ हे गाणे रीक्रिएट करण्यात आले आहे. या गाण्यात हॉलीवूड सुपरस्टार विल स्मिथ कॅमियो रोलमध्ये दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वी विल स्मिथला “राधा तेरी चुनरी’ या गाण्यावर डान्स करताना पाहण्यात आले होते. दरम्यान, विल स्मिथबाबत करण म्हणाला की, एका शोच्या शूटिंगसाठी स्मिथ आला होता. पण चित्रपटात तो आहे की नाही हे जाणण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.

दरम्यान, “स्टूडंट ऑफ द इयर 2′ चित्रपट पुढील महिन्या प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि तारा सुतारिया हे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून टायगर श्रॉफ मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)