राहुल गांधीच काय त्यांचे वारस देखील AFSPA हटवू शकणार नाहीत – अमित शहा

File photo

बिहार – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज बिहारमधील समसीतपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने आपल्या लोकसभा निवडणुकांसाठीच्या जाहीरनाम्यामध्ये सत्तेवर आल्यास सशस्त्र दलांना विशेष अधिकार देणाऱ्या AFSPA कायद्यामध्ये संविधानिक संशोधन घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील AFSPA कायद्यामध्ये संशोधन घडवून आणण्याच्या आश्वासनावर सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जोरदार हल्ला चढवत काँग्रेस भारताचे तुकडे-तुकडे करण्याच्या मागे लागली असल्याचे आरोप केले आहेत. अशातच आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील काँग्रेसवर हल्ला चढवला असून ते म्हणतात, “AFSPA कायदा रद्द केला पाहिजे का? मी या ठिकाणी राहुल बाबांना सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये AFSPA कायदा रद्द करू शकणार नाहीत, एवढंच काय तर तुमच्यानंतर तुमचा ‘गांधी’ घराण्याचा वारस जरी आला तरी तो देखील AFSPA कायदा रद्द करू शकणार नाही.”  .

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)