सपमध्ये परतणार नाही; मात्र हातमिळवणीस तयार : शिवपाल यादव

लखनौ: समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यांनी स्वगृही परतण्याची शक्‍यता फेटाळून लावली आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीत सपशी हातमिळवणी करण्यास ना नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शिवपाल आणि अखिलेश या काका-पुतण्यांमधील मतभेद विकोपाला गेल्याने काही महिन्यांपूर्वी सपमध्ये यादवी निर्माण झाली. त्यातून शिवपाल यांनी प्रगतीशील समाजवादी पक्ष-लोहिया (पीएसपीएल) या नावाने स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.

आता लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, स्थिती अनुकूल बनल्यावर काका-पुतणे एकत्र येतील, असे भाकित अलिकडेच सपचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी केले. त्याबाबतचा प्रश्‍न पत्रकारांनी विचारल्यावर शिवपाल यांनी सपमध्ये पक्ष विलीन करण्याची किंवा पुन्हा सपमध्ये परतण्याची शक्‍यता फेटाळून लावली. उत्तरप्रदेशात आमचा पक्ष मजमूब स्थितीत आहे. समविचारी पक्षांशी आघाडी झाली नाही तर आमचा पक्ष उत्तरप्रदेशातील लोकसभेच्या सर्व 80 जागा लढवेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमच्या पाठिंब्याशिवाय केंद्रात पुढील सरकार स्थापन होऊ शकणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी बोलून दाखवला. अर्थात, भाजपचा पराभव करण्यासाठी समविचारी पक्षांशी हातमिळवणी करण्याची तयारी त्यांनी यावेळी दर्शवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)