…म्हणून टीआरएस सोबत सत्ता स्थापणार नाही : ओवैसी

हैदराबाद:  तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) पक्षाशी आघाडी असली तरी निवडणुकीनंतर मात्र आम्ही त्या पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी होणार नाही असे वक्तव्य  एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी आज हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

या निवडणुकीत टीआरएस पक्ष स्वबळावर सरकार स्थापन करील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील जनतेचे केसीआर यांच्यावर प्रेम असून तेच पुन्हा त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवतील असा विश्‍वास त्यांनी बोलून दाखवला. मुळात टीआरएस पक्षाला स्वबळावरच बहुमत मिळणार असल्याने त्यांना आमच्या पाठिंब्याची गरजच लागणार नाही आणि जरी लागली तरी आम्ही त्यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार नाही असे ते म्हणाले.

एमआयएम पक्षाने २०१४ निवडणुकांमध्ये सात जागांवर विजय मिळवला होता. यावेळी एमआयएमने ८ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. आपला पक्ष लढवण्यात आलेल्या सर्वच जागांवर विजय मिळवेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

एमआयएम या पक्षाला रोखण्याचा प्रयत्न अमित शहा आणि राहुल गांधी या दोघांनीही चालवला आहे. विधानसभेत आमचे अस्तित्वच दिसू नये असा त्यांचा प्रयत्न होता असेही त्यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)