पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही : सुषमा स्वराज यांची घोषणा 

प्रकृती अस्वास्थ्यतेचे दिले कारण 

नवी दिल्ली: परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी पुढील लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या सध्या मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तेथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा निर्णय घोषित केला. मध्यप्रदेशातल्याच विदीशा लोकसभा मतदार संघातून त्या संसदेत प्रतिनिधीत्व करीत आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव आपण हा निर्णय घेतला आहे असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. आपण आपला निर्णय पक्षाला कळवला आहे. ते याबाबत निर्णय घेतील पण आपला विचार पक्का आहे असे त्या म्हणाल्या.

-Ads-

आजारपणामुळे त्या मतदार संघात बऱ्याच दिवसात गेल्या नव्हत्या. त्यावरून त्यांच्या मतदार संघात त्यांच्या बेपत्ता होण्याविषयी काही पोस्टर्स झळकली होती. त्या विषयी पत्रकारांनी आज इंदोैर मध्ये त्यांना प्रतिक्रीया विचारल्यानंतर त्यांनी आता आपण निवडणूकच न लढवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती दिली. तथापी त्या अत्यंत अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्या असल्याने पक्षाकडून त्यांना राज्यसभेची ऑफर दिली जाऊ शकते असे सांगण्यात येते.

या निर्णयामागे कोणतेही राजकारण नाही असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांना आजारपणामुळे इन्फेक्‍शन टाळण्याची सुचना करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीयदृष्ट्या विशेष काळजी घ्यावी लागत असल्याने त्यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहायचे ठरवले आहे. त्यांनी आत्ता पर्यंत एकूण 11 निवडणुका लढवल्या आहेत. सन 2016 पासूनच त्यांनी सार्वजनिक कार्यक्रम स्वीकारणे बंद केले आहे. त्यांना मधुमेहाचा मोठा विकार असून त्यांच्यावर अलिकडेच किडनी रोपणाचीही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)